नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलमध्ये बरेच विक्रम होताना आपण पाहत आहोत. पण यामध्ये काही नकोसे विक्रमही आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यावर्षीच्या आयपीएलमध्ये तब्बल चारवेळा शून्यावर एक फलंदाज बाद झालेला आहे. पण हा फलंदाज आहे तरी कोण, हे जाणून घ्यायची उत्सुकता चाहत्यांना आहे. आतापर्यंतच्या सात सामन्यांमध्ये चारवेळा भोपळाही न फोडणारा फलंदाज पंजाब किंग्सच्या संघात आहे. राजस्थान रॉयल्सबरोबरच्या पहिल्या सामन्यात हा फलंदाज शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर झालेल्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यातही त्याला भोपळा फोडता आला नाही. त्यानंतर झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याची शून्यावर बाद होण्याची हॅट्रीक झाली असती पण या सामन्यात त्याने ९ धावा केल्या. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही तो पुन्हा शून्यावर बाद झाला. त्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर झालेल्या केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याला १९ धावा करता आल्या. आजच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो पुन्हा एकदा भोपळा फोडू शकला नाही. आतापर्यंतच्या आयपीएलमधील सात सामन्यांमध्ये तो चारवेळी शून्यावर बाद झाला आहे. आतापर्यंत आयपीएलच्या सात सामन्यांमध्ये त्याला फक्त २८ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे पंजाबच्या संघाला जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर त्यांना पुरनला वगळण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पंजाबचा संघ हा निर्णय कधी घेणार, याकडे लक्ष लागलेले असेल. हा भोपळेकर फलंदाज आहे तरी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा पंजाबचा फलंदाज आहे निकोलस पुरन. वेस्ट इंडिजचा हा खेळाडू धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळकला जातो. पण यावर्षीच्या आयपीएलमध्ये तर पुरनला लय सापडलेली दिसत नाही. त्यामुळे आता पुढच्या सामन्यात पुरनला संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कारण आतापर्यंत संघाने त्याच्यावर बराच विश्वास ठेवला आहे. पण पुरनला या संधीचे सोने करता आलेले नाही. त्यामुळे आता पुढच्या सामन्यांमध्ये पुरनला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता धुसर वाटत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nIsPSc
No comments:
Post a Comment