मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराउंडर रविंद्र जडेजाने वादळी खेळी केली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने १९ षटकात १५४ धावा केल्या होत्या. त्यानंतर २० षटकात त्यांनी १९१ धावांपर्यंत मजल मारली. वाचा- जास्ती जास्त १७० धावांपर्यंत मजल मारेल असे वाटले होते. आरसीबीकडून १९वे षटक या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज टाकत होता. चेन्नईकडून जडेजा स्ट्राइकवर होता. या अखेरच्या षटकात जडेजाने इतिहास घडवला आणि सामन्याचे चित्रच बदलले. त्याने हर्षलला पाच षटकार आणि एक चौकार व दोन धावा अशा ३७ धावा केल्या. वाचा- असे होते २०वे षटक १ चेंडू- षटकार २ चेंडू- षटकार ३ चेंडू- षटकार(नो बॉल) ३ चेंडू- षटकार ४ चेंडू- दोन धावा ५ चेंडू- षटकार ६ चेंडू- चौकार वाचा- आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात महाग ओव्हर ठरली आहे. याआधी ख्रिस गेलने ३७ धावा केल्या होत्या. या खेळीत जडेजाने फक्त २३ चेंडूत ५० धावा केल्या. २० षटकानंतर चेन्नईने १९१ धावा तर जडेजाने २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32Lr2lx
No comments:
Post a Comment