नवी दिल्ली: आयपीएलचे विद्यमान विजेते संघाची आज गुरुवारी संघाविरुद्ध लढत होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला अद्याप अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. आतापर्यंत झालेल्या पाच पैकी फक्त दोन लढतीत त्यांचा विजय झालाय. गेल्या सामन्यात पंजाब किंग्जने त्यांचा ९ विकेटनी पराभव केला होता. वाचा- मुंबई इंडियन्सने आतापर्यंतच्या लढती चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळल्या आहेत. यापुढील लढती ते दिल्लीच्या अरुण जेठली मैदानावर खेळणार आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाची अवस्था देखील मुंबईसारखीच आहे. त्यांनी पाच पैकी दोन विजय तर तीन मध्ये पराभव स्विकारलाय. अखेरच्या लढतीत त्यांनी कोलकाता नाइट रायडर्सवर सहा विकेटनी विजय मिळवला होता. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध हीच कामगिरी पुन्हा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. वाचा- मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत २०१ धावा केल्या आहेत. तो चांगली सुरूवात करून देतो पण मोठी धावसंख्या करू शकला नाही. त्याचा सलामीचा जोडीदार क्विंटन डी कॉक अद्याप फॉर्ममध्ये दिसत नाही. मुंबईची सर्वात मोठी डोकेदुखी मधल्या फळीतील फलंदाज आहेत. ज्यापैकी एकालाही चांगली कामगिरी करता आली नाही. सूर्यकुमार यादव १५४ धावा, हार्दिक पंड्या ३६ धावा, क्रुणाल पंड्या २९ धावा तर कायरन पोलार्ड ६५ धावा अशी कामगिरी आहे. मुंबईला जर विजय मिळवायचा असेल तर त्यांच्यासमोर एकच मार्ग आहे तो म्हणजे मधळ्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी करणे होय. वाचा- गोलंदाजीत ट्रेंट बोल्ड ६ विकेट, जसप्रीत बुमराह ४ विकेट सह डेथ ओव्हरमध्ये शानदार कामगिरी केली आहे. फिरकीपटू राहुल चहरने आतापर्यंत ९ विकेट घेतल्या आहेत. तर क्रुणाल पंड्याने देखील चांगली गालंदाजी केली आहे. दिल्लीच्या अरुण जेठली मैदानावर ही जोडी कमाल करू शकते. रोहित शर्मा पोलार्डचा सहावा गोलंदाज म्हणून वापर करत आहे तर हार्दिकला फक्त फलंदाज म्हणून खेळवले जात आहे. राजस्थान धक्क्यातून कसे बाहेर येणार राजस्थान संघ यावर्षी मोठ्या अडचणीत आहे. जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन एड्यू टाय या चार खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे राजस्थानचा संघ कमकूवत झाला आहे. आजच्या सामन्यासाठी त्यांची सलामीची जोडी देखील ठरलेली नाही. मनन व्होरा आणि यशस्वी जयसवाल यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. जोस बटलर आणि संजू सॅमसन यांना कामगिरीत सातत्या ठेवावे लागणार आहे. त्याच बरोबर शिवम दुबे, रियान पराग आणि डेव्हिड मिलर यांना फलंदाजीत योगदान द्यावे लागले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eHHAQP
No comments:
Post a Comment