चेन्नई : राजस्थानच्या संघाने आजच्या सामन्यासाठी आपल्या संघात एका युवा मंबईकर खेळाडूला संधी दिली आहे. पण राजस्थानने या सामन्यात दोन बदल केले आहेत. राजस्थानच्या संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचा हा युवा खेळाडू चमकदार कामगिरी करून संघाला विजय मिळवून देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राजस्थानच्या संघाने यावेळी नाणेफेक जिंकली आणि कोलकाताच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. पण त्यानंतर आपल्या संघातील बदल सांगताना मात्र संजू विसरल्याचे पाहायला मिळाले. पण यावेळी काही वेळातच त्याच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली आणि त्यानंतर आजच्या सामन्यात मुंबईचा कोणता खेळाडू खेळणार आहे, ते संजूने स्पष्ट केले. यावेळी राजस्थानच्या संघात मुंबईचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत राजस्थानने मनन व्होराला संधी दिली होती, पण तो सातत्याने अपयशी ठरल्याचे समजल्यावर मात्र या सामन्यात यशस्वीला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थानच्या संघात अजून एक बदल करण्यात आला आहे. राजस्थानने यावेळी आपल्या संघात .वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी दिली आहे आणि श्रेयस गोपाळला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाताच्या संघाने या सामन्यासाठी आपल्या संघात एकच बदल केला आहे. या सामन्यासाठी कमलेश नागरकोटीला संघातून वगळण्यात आले आहे. नागरकोटीच्या जागी यावेळी शिवम मावीला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात मावी कशी गोलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे आजचा सामना कोलकाता जिंकणार की राजस्थान याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आजचा सामना होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी चार सामने खेळले आहेत, पण या चार लढतींमध्ये त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला आहे.त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ विजयाच्या वाटेवर परततो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्याच्या घडीला राजस्थानचा संघ आठव्या स्थानावर असून कोलकाताचा संघ सातव्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ayRTWs
No comments:
Post a Comment