मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातून आणखी ३ खेळाडूंनी माघार घेतली आहे. स्पर्धा सुरू असताना देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कारण देत या खेळाडूंनी मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२१मध्ये आतापर्यंत २० लढती झाल्या आहेत. याआधी काही खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतील होती. वाचा- क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघातील फिरकीपटू , आणि यांनी देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयपीएल २०२१ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. रविवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू आर अश्विनने करोनामुळे स्पर्धेतून माघार घेतली. अश्विनच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यासाठी अश्विनने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. वाचा- ज्या तीन ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी एडम झम्पा आणि केन रिचर्डसन हे विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतात. तर एड्यू टाय हा राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. झम्पाने आरसीबीकडून एकही मॅच खेळली नव्हती तर रिचर्डसनने फक्त एक मॅच खेळली होती. टायला या हंगामात राजस्थान संघाने एकही संधी दिली नव्हती. आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू झाला. त्याआधी अनेक खेळाडूंनी कोरना आणि अन्य कारणांमुळे माघार घेतली होती. यात जोश हेजलवूडचा देखील समावेश होता. तर काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन याने बाबो बबलमुळे थकवा आल्याचे कारण देत माघार घेतली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3np7RaS
No comments:
Post a Comment