मुंबई : सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एकाच सामन्यात तीन विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले. वॉर्नरने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले, त्याचबरोबर तीन विक्रमही आता वॉर्नरच्या नावावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जी गोष्ट विराट कोहली, रोहित शर्मा यांनाही जमली नाही, ती गोष्ट वॉर्नरने या सामन्यात करुन दाखवली आहे. वॉर्नरने या सामन्यात ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आपल्या १० हजार धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा तो चौथा फलंदाट ठरला आहे. आतापर्यंत क्रिकेट विश्वात १० हजार धावा ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक यांनाच करता आल्या आहेत. त्यानंतर १० हजार धावा करणारा वॉर्नर हा क्रिकेट विश्वातील चौथा फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने या सामन्यात दोन षटकारही लगावले. या दोन षटकारांसह आयपीएलमध्ये २०० षटकार पटकावण्याचा विक्रम आता वॉर्नरच्या नावावर झाला आहे. आतापर्यंत काही मोजक्याच फलंदाजांना आयपीएलमध्ये २०० षटकार लगावता आले आहेत. या यादीमध्ये आता वॉर्नरचाही समावेश झाला आहे. वॉर्नरने या सामन्यात आपले अर्धशतकही साकारले. आयपीएलमध्ये ५० अर्धशतके झळकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. पण यावेळी एक नकोसा विक्रमही वॉर्नरच्या नावावर झालेला पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंतचे वॉर्नरचे हे सर्वात संथ अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी वॉर्नरने २०१९ साली किंग्स इलेव्हन पंजाबबरोबर खेळत असताना ४९ चेंडूंत अर्धशतक साकारले होते. या सामन्यात मात्र वॉर्नरला आपले अर्धशतक झळकावण्यासाठी ५० चेंडू लागले. त्यामुळे वॉर्नरच्या नावावर हा नकोसा विक्रमही आता झाला आहे. त्याचबरोबर आयपीएमध्ये सर्वाधिक अर्धशतकं रचण्याच्या यादीतही वॉर्नरचा समावेश झाला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज सनरायझर्स हैदराबादबरोबर दोन हात करणार आहे. आजच्या सामन्यात जर चेन्नईने विजय मिळवला तर त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. त्यामुळे चेन्नईसाठी हा सामना महत्वाचा असेल. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा संघ सध्याच्या घडीला गुणतालिकेत तळाला असून त्यांचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्सबरोबर होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32VMowD
No comments:
Post a Comment