अहमदाबाद: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स () आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ( ) या दोन संघामध्ये लढत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होणार असून दोन्ही संघात गुणतक्यातील अव्वल स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा असेल. वाचा- ... गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीचा विजय रथ रोखला होता. तर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. वाचा- दिल्लीच्या विरुद्ध आरसीबीला मधळ्या फळीतील फलंदाजी चांगली करावी लागणार आहे. सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांनी देखील चांगली फटकेबाजी केली आहे. पण मधळ्या फळीतील फलंदाजांनी निराश केले आहे. पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरच्या मध्ये आरसीबीला धावा करण्यात अपयश आलय. दिल्लीविरुद्ध ही कमकूवत बाजू आरसीबीची डोकेदुखी ठरू शकते. दिल्लीकडे अमित मिश्रा, अक्षर पटेल सारखे शानदार गोलंदाज आहेत जे धावा रोखण्यासोबत विकेट देखली घेतात. वाचा- चेन्नई विरुद्धच्या सामन्यात बेंगळुरूचा जलद गोलंदाज हर्षल पटेल याला रविंद्र जडेजाने एका षटकात ३७ धावा मारल्या होत्या. त्या एका ओव्हरमुळे सामन्याचे चित्रच बदलले. हर्षल या हंगामातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच बरोबर मोहम्मद सिराज आणि कायले जेमीसन यांना देखील चांगली कामगिरी करावी लागले. फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासमोर कमी धावा देण्याचे आव्हान असेल. दिल्लीचा विचार केल्यास शिखर धवनने मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. सोबत पृथ्वी शॉ देखील आक्रमक फलंदाजी करतोय. मधळ्या फळीत ऋषभ पंत, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टायोनिस आणि शिमरॉन हेटमायर असे फलंदाज आहेत. संभाव्य संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅन ख्रिस्टीन, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल. दिल्ली कॅपिटल्स- शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत(कर्णधार), शिमरॉन हेटमायर, मार्क स्टायोनिस, अक्षर पटेल, ललित यादव, कगिसो रबाडा, अवेश खान, अमित मिश्रा
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nmc0fC
No comments:
Post a Comment