
ख्राइस्टचर्च : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरी आणि अखेरची टी-२० लढत पावसामुळे प्रत्येकी १० षटकाची करण्यात आली. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वाचा- प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या न्यूझीलंडने धमाकेदार फलंदाजी केली. मार्टिन गप्टिल आणि यांनी बांगलदेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. गप्टिलने १९ चेंडूत ४४ धावा तर फिनने फक्त १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५.४ षटकात ८५ धावा केल्या. गप्टिलने ४४ धाा १ चौकार आणि ५ षटकार मारले. वाचा- वाचा- या सामन्यात सर्वाधिक धमाका केला तो फिन याने. त्याने न्यूझीलंडकडून टी-२०मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे वेगाने अर्धशतक करण्याचा विक्रम केला. फिनने कॉलिन मुन्रोच्या विक्रमाशी बरोबरी केली. मुन्नोने १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. फिन एलनने २९ चेंडूत ७१ धावा केल्या. यात १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. फिनच्या या स्फोटक फलंदाजीमुळे न्यूझीलंडने १० षटकात ४ बाद १४१ धावांचा डोंगर उभा केला. वाचा- वाचा- फिनची ही फलंदाजी पाहून येत्या ९ तारखेपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमधील आणि त्याचा कर्णधार हे नक्कीच खुश झाले असतील. फिन या वर्षी RCBकडून खेळणार आहे. वाचा- ...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m7akpG
No comments:
Post a Comment