
मुंबई: मजबूत फलंदाजी संघात असलेले पॉवर हिटर आणि जबरदस्त वेगवान गोलंदाजांचा मारा असलेल्या मुंबई इंडियन्स()ने पाच वेळा ()चे विजेतेपद मिळवले आहे. या वर्षी मुंबईला आयपीएलच्या विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी असून मुख्य दावेदारांमध्ये मुंबईचा संघ आघाडीवर आहे. पण संघात एक कमकूवत बाजू आहे जी त्यांच्या विजेतेपदापासून दूर घेऊन जाऊ शकेत. वाचा- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला ९ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पहिली मॅच खेळायची आहे. मुंबईने २०१९ आणि २०२० विजेतेपद मिळवले होते. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई इंडियन्सने त्यांच्या मुख्य खेळाडूंना संघात ठेवले आहे. हेच मुंबईच्या आयपीएलमधील दबदब्याचे मुख्य कारण आहे. वाचा- मजबूत फलंदाजी मुंबई इंडियन्सची सर्वात मजबूत बाजू कोणती असेल तर ती म्हणजे, फलंदाजी होय. रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक ही सलामीची जोडी दमदार आहे. गरज पडली तर ख्रिस लिन सलामीला येऊ शकतो. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे हुकमी एक्के मुंबईकडे आहेत. या दोघांनी नुकतेच भारताकडून पदार्पण केले आहे. मधल्याफळीत पंड्या बंधू, कायरन पोलार्ड यांच्यामुळे मुंबईला मोठा फायदा होतो. वाचा- गोलंदाजीबाबत बोलायचे तर भारताचा सर्वोत्तम जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह मुंबईचा आघाडीचा गोलंदाज आहे. त्याला सोबत आहे ती न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची, तो पॉवर प्लेमध्ये विकेट घेतो. या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियाचा नाथन कुल्टर नाइलमुळे मुंबईच्या गोलंदाजीची धार आणखी धोकादायक होते. वाचा- ही आहे कमकुवात बाजू मुंबई इंडियन्सची कमकुवत बाजू आहे त्यांची फिरकी गोलंदाजी होय. मुंबईला या वर्षी सर्वाधिक सामने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळायचे आहेत. या मैदानावर फिरकी गोलंदाजीचे महत्त्व अधिक आहे. मुंबईकडे विकेट घेणारा फिरकी गोलंदाज नाही. ही कमकुवत बाजू त्याची मोठी डोकेदुखी ठरू शकते. वाचा- क्रुणाल पंड्या धावांवर अकुंश राखू शकतो. पण तो विकेट घेण्यात अद्याप तितका सक्षम नाही. अशात युवा गोलंदाज राहुल चहरवर अधिक जबाबदारी येते. गेल्या हंगामात जयंत यादवने दोन सामने खेळले होते. या वर्षी त्याला किती संधी मिळते हे पाहावे लागेल. मुंबईने यावर्षी पियुष चावला याला संघात घेतले आहे. चहर आणि क्रुणाल या जोडीमुळे त्याला अधिक सामन्यात संधी मिळण्याची शक्यता नाही. चावलाने आयपीएलमध्ये १५६ विकेट घेतल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rFPhf8
No comments:
Post a Comment