चेन्नई: आयपीएलचा १४वा हंगाम ()साठी खास आहे. या वर्षी मुंबईला विक्रमी सहावे तर सलग तिसरे विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबई इंडिन्सने दुसऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सवर धमाकेदार विजय मिळवला. वाचा- या सामन्यात मुंबईचा कर्णधार ()ने पुन्हा एकदा सर्वांचे मन जिंकले. रोहित शर्मा जेव्हा मैदानात उतरला तेव्हा सर्वांची नजर गेली ती त्याच्या बुटावर, रोहितच्या बुटावर यावेळी PLASTIC FREE OCEAN असे लिहण्यात आले होते. समुद्राला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी त्याने संदेश दिला. वाचा- याआधी पहिल्या सामन्यात Save the Rhinos असे लिहण्यात आले होते. रोहित शर्मा नेहमीच गेंड्यांना वाचवण्या संदर्भात नेहमी बोलत असतो. तसेच त्याच्या संदर्भातील अभियानात देखील तो जोडला गेला आहे. वाचा- रोहितने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात प्लास्टिक मुक्त समुद्रासाठी जनजागृती केली. यासंदर्भात त्याने इस्टाग्रामवर देखील पोस्ट लिहली. पाहा रोहितची दुसऱ्या सामन्यातील पोस्ट- वाचा- सलग दोन सामन्यात रोहितने त्याच्या बुटावर खास असे संदेश लिहले होते. यावरून हे स्पष्ट होते की रोहित नक्कीच कोणत्यातरी अभियानावर आहे आणि लोकांच्यात जागृती निर्माण करण्याचे काम करत आहे. रोहितची पहिल्या सामन्यातील पोस्ट-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dWBI64
No comments:
Post a Comment