चेन्नई: आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईची फलंदाजी अतिशय खराब झाली. त्यांनी २० षटकात फक्त १५२ धावा केल्या होत्या. पण या धावसंख्येच्या जवळ पोहोचून कोलकाताचा पराभव झाला. वाचा- मुंबईविरुद्ध अखेरच्या दोन षटकात कोलकाताला १९ धावांची गरज होती. मैदानावर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल सारखे अनुभवी फलंदाज होते. पण मुंबईच्या जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी १२ चेंडूत फक्त ९ धावा दिल्या. वाचा- कोलकाताची सुरूवात धमाकेदार झाली होती. त्यांनी ९ षटकात ७२ धावा केल्या होत्या. तरी मुंबईने विजय मिळवला. कोलकाताचे सलामीवीर शुभमन गिल ३३ आणि नितिश राणाने अर्धशतक केले. हे दोन फलंदाज वगळता अन्य कोणालाही दुहेरी धाव काढता आली नाही. वाचा- मुंबईकडून राहुल चहरने चार विकेट घेतल्या. या पराभवानंतर संघाचा मालक भडकला आणि त्याने सोशल मीडियावर चाहत्यांची माफी मागितली. मी फक्त इतकेच सांगू इच्छितो की अतिशय खराब कामगिरी झाली. केकेआरच्या चाहत्यांची मी माफी मागतो, असे त्याने ट्विटवर म्हटले आहे. त्याचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. वाचा- सामन्यात १५व्या षटकापर्यंत कोलकाताचा विजय होईल असे चित्र होते. त्यांना ३० चेंडूत ३१ धावा हव्या होत्या आणि सात विकेट हातात होत्या. पण मुंबईच्या गोलंदाजांनी अशी काही कामगिरी केली की कोलकाताच्या तोंडातील विजयाचा घास काढून घेतला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aaMmou
No comments:
Post a Comment