चेन्नई: मध्ये आज पाचवी लढत गतविजेते आणि यांच्यात होणार आहे. स्पर्धेत या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला असून यात मुंबईने RCB विरुद्ध पराभव तर कोलकाताने सनरायझर्सवर विजय मिळवला. वाचा- मुंबईचा संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल तर कोलकाताची नजर दुसरा विजय मिळून गुणतक्तात अव्वल स्थानी झेप घेण्याची असेल. या दोन्ही संघातील आतापर्यंतची कामगिरी पाहता मुंबई इंडियन्स अधिक मजबूत दिसतो. या दोन्ही संघात गेल्या १२ लढतीत कोलकाताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. आयपीएलच्या सुरुवातीपासून दोन्ही संघात २७ लढती झाल्या असून त्यात मुंबईने २१ सामन्यात विजय मिळवला आहे. वाचा- गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये मुंबईने साखळी फेरीत कोलकाताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. दोन्ही संघातील गेल्या पाच सामन्यात कोलकाताने फक्त एकात विजय मिळवला आहे. यामुळे आजच्या लढतीत देखील मुंबईचे पारडे जड असणार आहे. वाचा- पहिल्या लढतीत पराभव झाल्याने मुंबई इंडियन्स विजयासाठी जोरदार प्रयत्न करेल. तर हैदराबादवरील विजयाने कोलकाताचा आत्मविश्वास वाढला असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e1OFLM
No comments:
Post a Comment