Ads

Tuesday, April 13, 2021

IPL 2021 Points Table: प्रत्येक संघाचा एक मॅच झाली; पाहा टॉप चार आणि तळातील चार संघ

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात सोमवारपर्यंत एकूण चार सामने झालेत. स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येक संघाचा एक सामना झाला आहे. सोमवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत झाली. या सामन्यता पंजाबने चार धावांनी विजय मिळवला. वाचा- हंगामातील प्रत्येक संघाच्या एका सामन्यानंतर गुणतक्त्यात कोणता संघ कोणत्या स्थानावर हे जाणून घेऊयात. आतापर्यंत , कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी विजय मिळवला आहे. तर मुंबई इंडियन्स, , सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांचा पराभव झाला आहे. गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्सने प्लस ०.७७९ रनरेटसह पहिले स्थान मिळवले आहे. कोलकाता नाइट रायडर्सने प्लस ०.५००सह दुसरे, पंजाब किंग्जने प्लस ०.२०० सह तिसरे तर रॉयल चॅलेंजर्सने प्लस ०.०५० सह चौथे स्थान मिळवले आहे. वाचा- पराभूत संघांमध्ये मुंबई इंडियन्स (नेट रनरेट वजा ०.०५०) पाचव्या, राजस्थान रॉयल्स सहाव्या, सनरायजर्स हैदराबाद सातव्या तर चेन्नई सुपर किंग्ज वजा ०.७७९ रनरेटसह आठव्या स्थानावर आहे. आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघांची ही हंगामातील दुसरी लढत आहे. त्यामुळे विजय मिळून आघाडी घेण्याचा दोघांचा प्रयत्न असेल. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये संजू सॅमसन आघाडीवर आहे. त्याने पंजाबविरुद्ध ११९ धावा केल्या. या हंगामातील हे पहिले शतक ठरले. ९१ धावांसह केएल राहुल दुसऱ्या तर ८५ धावांसह शिखर धवन तिसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये हर्षल पटेल पाच विकेटसह पहिल्या स्थानावर आहे. चेतन सकारिया आणि अर्शदिप सिंग हे दोघे प्रत्येकी ३ विकेसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mIB1kX

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...