मुंबई : आयपीएलच्या १४व्या हंगामात दोन दिवासत चार खेळाडू आणि एका सपोर्ट स्टाफमधील सदस्याला करोना झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धा स्थगित करताना सर्व खेळाडूंना घरी सुरक्षितपणे पोहोचवण्याची जबाबदारी बीसीसीआयची असेल असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. वाचा- आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंसोबत परदेशी खेळाडू देखील खेळत आहेत. त्यामुळे हे परदेशी खेळाडू त्यांच्या मायदेशात कसे जातील असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आयपीएलच्या बायो बबलमध्ये असलेल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची करोना चाचणी होणार आहे. हा चाचणीचे रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना घरी जाता येणार आहे. वाचा- ... आयपीएल स्थगित झाल्याच्या वृत्तानंतर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये वॉर्नरच्या दोन्ही मुलींनी चित्र काढले आहे आणि त्यात मेसेज लिहला आहे. लवकर घरी या बाब, आम्हाला तुमची खुप आठवण येते. आम्ही तुमच्यावर खुप प्रेम करतो, असे मेसेज या चित्राच्या खाली लिहला आहे. वॉर्नरसाठी आयपीएलचा १४वा हंगाम फार चांगला ठरल नाही. त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने ६ पैकी ५ लढती गमावल्या होत्या. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले होते. इतक नव्हे तर हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीत त्याला अंतिम ११ मध्ये स्थान दिले नव्हते. वाचा- या स्पर्धेशी जोडल्या गेलेल्या परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी आम्ही मार्ग शोधत आहोत, असे बीसीसीआयचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. भारतात कोरना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ee8BfV
No comments:
Post a Comment