अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष यांनी सोमवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानातून भाषण केले. मोटेरा क्रिकेट स्टेडियममधून बोलताना ट्रम्प यांनी क्रिकेटमधील मास्टर ब्लास्टर आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा उल्लेख केला. पण सचिनचा उल्लेख करताना ट्रम्प यांनी उच्चारात थोडी चूक केली आणि त्याच्या याच चुकीवर आता सोशल मीडियावर युझर्स ट्रोल करत आहेत. ट्रम्प यांनी भाषणात सचिनचा उल्लेख 'सुचिन' असा केला. आता ही गोष्ट नेटकरांच्या लक्षात येणार नाही असे शक्य नाही. ट्रम्प यांच्या 'सुचिन' या उल्लेखावरून सोशल मीडियावर युझर्सनी प्रतिक्रिया देण्यास सुरू केली. फक्त सामान्य युझर्स नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने देखील यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात गुगल सर्च इंजिनवर सचिन तेंडुलकरचे नाव सर्च करताना 'सुचिन' असे लिहलेले दाखवण्यात आले आहे आणि मग तेच नाव सेव्ह देखील केले जाते. आयसीसीचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात सचिन, विराटसह बॉलिवूडमधील डीडीएलजे, शाहरुख खान यांचा देखील उल्लेख केला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2usjXJb
No comments:
Post a Comment