दुबई: नुकत्याच दक्षिण आफिकेत झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात बांगलादेशने ३ विकेटनी विजय मिळवला आणि भारताला सलग दुसरे जेतेपद मिळवण्यापासून रोखले. या स्पर्धेतनंतर आयसीसीने १९ वर्षाखालील संघाची घोषणा केली आहे. यासंघात तिघा भारतीयांनी स्थान मिळवले आहे. आयसीसीने १९ वर्षाखालील संघाची निवड केली असून या संघाचे कर्णधारपद बांगलादेशचे नेतृत्व करणाऱ्या अकबर अलीकडे दिले आहे. संघात भारताचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वाल, फिरकीपटू रवी बिश्नोई आणि जलद गोलंदाज कार्तिक त्यागी यांचा समावेश करण्यात आला आहे. वाचा- यशस्वीने स्पर्धेत ६ सामन्यात ४०० धावा केल्या आहेत. बिश्नोईने तितक्याच सामन्यात १०.६४च्या सरासरीने १७ विकेट घेतल्या तर त्यागीने १३.९०च्या सरासरीने ११ विकेट घेतल्या आहेत. आयसीसीने संघात अफगाणिस्तानच्या इब्राहिम जारदान आणि वेस्टइंडिजच्या नईम यंग यांचा देखील समावेश केला आहे. विश्वविजेत्या बांगलादेश संघातील अकबर अली शिवाय अन्य दोन खेळाडूंचा समावेश संघात केला आहे. त्यामध्ये शहादत हुसैन आणि महमदुल हसन जॉय यांचा समावेश आहे. संघात अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी दोन तर कॅनडाच्या अकील कुमार याचा १२ वा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. या संघाची निवड मॅरी गॉडबीर, इयान बिशप, रोहन गावसकर, नताली जर्मनोस आणि श्रेष्ठ शाह यांच्या समितीने केली आहे. असा आहे संघ अकबर अली (कर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल (भारत), इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान), रविंन्दु रसन्था (श्रीलंका), महमदुल हसन जॉय (बांगलादेश), शहादत हुसैन (बांगलादेश),नईम यंग (वेस्ट इंडिज), शफीकुल्लाह गफारी (अफगाणिस्तान), रवी बिश्नोई (भारत), कार्तिक त्यागी (भारत), जायदेन सील (वेस्ट इंडिज), अकील कुमार (कॅनडा, १२वा खेळाडू)
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39tkRnl
No comments:
Post a Comment