चेन्नई : देशातील कोरना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयपीएलच्या १४व्या हंगामातून ज्या पाच खेळाडूंनी माघार घेतली होती. त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या आर अश्विनचा देखील समावेश होता. या शिवाय चार विदेशी खेळाडूंनी देखील माघार घेतली होती. अश्विनने करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाही तर कुटुंबातील सदस्याने करोना झाल्याने बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. वाचा- अश्विनची पत्नी प्रीती नारायणन यांनी सांगितले की गेल्या आठवड्यात कुटुंबातील एक दोन नव्हे तर १० जणांना करोनाची लागण झाली होती. यामुळेच अश्विनने गेल्या रविवारी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. वाचा- प्रीती नारायणन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्या म्हणतात, एका आठवड्यात कुटंबातील १० जण ज्यात ६ वयस्कर आणि ४ मुलांना करोनाची लागण झाली. सर्व जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल होते. हा पूर्ण आठवडा वाइट स्वप्ना सारखा होता. ३ पालकांपैकी १ घरी आले आहेत. वाचा- णाला विजयाची संधी या मेसेज सोबत प्रीतीने लस घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आव्हान केले आहे. स्वत:ला आणि कुटुंबियांना करोनापासून सुरक्षित करा. मानसिकदृष्ट्या आयोग्य चांगले राखण्यापेक्षा शारिरीक आरोग्य राखणे सोपे असते. पाच ते आठ दिवस फार कठीण होते. प्रत्येक जण मदतीसाठी तयार होते. पण तुमच्या जवळ कोणीच नव्हते. हा आजार तुम्हाला फार एकटा करतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eIVvGB
No comments:
Post a Comment