नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सहा लढतीत त्यांना फक्त १ सामन्यात विजय मिळवता आलय. गुणतक्यात ते सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. संघाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी सनरायझर्स संघ व्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेतलाय. वाचा- सनरायझर्स हैदराबादच्या सातत्याने होणाऱ्या पराभवाच्या पाश्वभूमीवर कर्णधार बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडचा कर्णधार याच्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे. हैदराबाद संघाने सोशल मीडियावर एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात केन या पुढील सामन्यात संघाचे नेतृत्व करेल असे म्हटले आहे. उद्या होणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीपासून केन विलियमसनकडे कर्णधारपद असेल. केनला कर्णधार करण्यात आले असले तरी डेव्हिड वॉर्नर संघात कायम असणार आहे असे संघाने म्हटले आहे. आयपीएल २०२१ मध्ये हैदराबाद संघाला पहिल्या सहा पैकी फक्त एका लढतीत विजय मिळवता आलाय. ते दोन गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. संघाने कर्णधार बदलण्याबरोबरच पुढील सामन्यात टीममध्ये मोठे बदल करणार असल्याचे सांगितले आहे. विदेशी खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नरला संघाबाहेर बसावे लागू शकते. हैदराबादचा आयपीएल २०२१ मधील आतापर्यंतचा प्रवास >> कोलकाताविरुद्ध १० विकेटनी पराभव >> बेंगळुरूविरुद्ध ६ धावांनी पराभव >> मुंबईविरुद्ध १३ धावांनी पराभव >> पंजाबविरुद्ध ९ विकेटनी विजय >> दिल्लीविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव >> चेन्नई विरुद्ध सात विकेटनी पराभव
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tawOIj
No comments:
Post a Comment