नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातील दोन खेळाडूंना करोना झाला आहे. त्यामुळे आजचा केकेआर विरुद्ध आरसीबी हा सामना रद्द करावा लागला. पण केकेआचे दोन खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडल्यावर संघात नेमकं कसं वातावारण आहे, याची माहिती आता पुढे आली आहे. केकेआरच्या संघात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आहे. कमिन्सने भारतामधील करोनाशी दोन हात करण्यासाठी काही दिवसांपूर्वी आर्थिक मदत केली होती. आता कमिन्सचा व्यवस्थापक निल मॅक्सवेलने केकेआरच्या संघात नेमके कसे वातावरण आहे, याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. मॅक्सवेलने यावेळी सांगितले की, " केकेआरच्या संघातील सर्व खेळाडू हे चांगले आहेत. त्याचबरोबर पॅट कमिन्सही सुरक्षित आहे. केकेआरच्या संघातील दोन खेळाडूंना करोना झाला आहे. पण त्यामुळे संघात कोणतीच समस्या नाही. सध्याच्या घडीला केकेआरच्या संघातील खेळाडू सुरक्षित आहेत आणि ही गोष्ट संघात योग्यपद्धतीने हाताळत आहे. संघातील खेळाडू हे चांगल्या मुडमध्ये आहेत आणि दोन खेळाडू करोना सापडल्याचा विपरीत परीणाम त्यांच्यावर झालेला नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी घाबरण्याचे काहीच कारण नाही." केकेआरच्या संघातील दोन खेळाडूंना करोना झाला. यामध्ये फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोघांनी नावं पुढे आली आहेत. या दोघांपैकी एक खेळाडू आयपीएलच्या बायो बबलमधून बाहेर गेला होता आणि तिथूनच करोनाची लागण या खेळाडूला झाली असे आता समोर येत आहे. वरुण चक्रवर्तीला दुखापत झाली होती. या दुखापतींची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी वरुण हा एका हॉस्पिटलमध्ये गेला होता. वरुणने यावेळी आयपीएलचे बायो बबल सोडले होते आणि त्याला ग्रीन चॅनेलमधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्याचवेळी वरुणला करोनाची लागण झाल्याचे आता समोर येत आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती केकेआरच्या संघाने दिलेली नाही. पण वरुण बायो बबलमधून बाहेर गेल्यानंतरच त्याला करोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PMjmwA
No comments:
Post a Comment