नवी दिल्ली : संघातील खेळाडूंना करोना झाल्यामुळे आजचा कोलकाता नाइट रायडर्सचा सामना रद्द करण्यात आला आहे. पण आयपीएलमध्ये उद्या मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना होणार आहे. हा सामनाही रद्द होणार की खेळवण्यात येणार, याबाबत बरीच चर्चा सुरु आहे. कारण आयपीएलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याचे म्हटले जात आहे. मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यातील सामना उद्या नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानात होणार आहे. पण आज अरुण जेटली मैदानातील पाच ग्राऊंड स्टाफला करोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिल्लीतील उद्याचा मुंबई इंडियन्स आणि हैदराबादचा सामना रद्द होणार, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. केकेआरचा आजचा सामना रद्द करण्यात आला असला तरी दिल्लीतील मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यातील सामना खेळवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण बीसीसीआयने फक्त आजचा केकेआर विरुद्ध आरसीबी हा सामना रद्द केला आहे. अन्य कोणताही सामना रद्द करण्याचा निर्णय अद्याप बीसीसीआयने घेतलेला नाही. त्याचबरोबर बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमध्ये फक्त एकच सामना पुढे ढकलण्यात आला आहे, अन्य कोणताही सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे दिल्लीतील उद्याचा मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना होण्याचे संकेत सध्याच्या घडीला मिळत आहेत. आज नेमकं काय घडलं, पाहा...आयपीएलमध्ये आज एकूण १० जणांना करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये दोन खेळाडूंचाही समावेश आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना करोना झाल्याचे वृत्त समोर आले होते. यामुळे आज होणारी कोलकाता आणि बेंगळुरू मॅच पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील तिघांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले. यात संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनरचा समावेश आहे. दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे, संघातील कोणत्याही खेळाडूला किंवा अन्य कोणालाही करोनाची लागण झालेली नाही. त्याचबरोबर नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानातील पाच कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची माहिती समोर आली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RfVTEm
No comments:
Post a Comment