नवी दिल्ली : आयपीएलचा १४वा हंगाम सुरू असताना संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा- केएल राहुलला अपेंडिसिटिसचा त्रास झाल्याने त्याला शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुलने मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने सात सामन्यात ३३१ धावांसह ऑरेंज कॅप स्वत:कडे राखली आहे. वाचा- राहुलला अपेंडिसिटिसचा त्रास होत असल्याचे निदान झाले. यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती. सुरक्षेसाठी म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे संघाने निवेदनात म्हटले आहे. वाचा- आज (रविवारी) थोड्याच वेळात पंजाब किंग्जची लढत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. ही लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून राहुलच्या गैरहजेरीत मयांक अग्रवालकडे संघाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tfNlKW
No comments:
Post a Comment