नवी दिल्ली : कायरन पोलार्डने शनिवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला एकहाती विजय मिळवून दिला. विजय साकारल्यावर पोलार्ड हा हात जोडून आभाळाकडे पाहत उभा राहीला. त्यावेळी पोलार्डने असे का केले, हे कोणालाही समजले नाही. पण या कृतीमागचे सत्य नेमके काय आहे, हे आता समोर आले आहे. पोलार्डने शनिवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या सामन्यात फक्त ३४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद ८७ धावांची दमदार खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू मैदानात धावत गेले. पण त्यावेळी पोलार्ड हा हात जोडून आभाळाकडे पाहत उभा होती. पोलार्डने नेमकं असं का केलं, याबाबतची खरी गोष्ट आता समोर आली आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी पोलार्डच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे या विजयानंतर त्याला गहिवरुन आले होते. आपली ही खेळी त्याने आपल्या वडिलांना समर्पित केली. पोलार्डने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या वडिलांच्या निधनाची एक पोस्ट टाकली होती. तुमच्या आत्म्याला शांती लाभो, असे पोलार्डने या पोस्टमध्ये लिहिले होते. त्यामुळे या विजयानंतर पोलार्डला आपल्या वडिलांची आठवण झाली आणि त्याने हा विजय आपल्या वडिलांना समर्पित केल्याचे म्हटले जात आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघाने मुंबई इंडियन्सपुढे २१९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करत असताना मुंबईचे सर्व बिनीचे फलंदाज बाद झाले होते, अपवाद होता फक्त पोलार्डचा. कारण पोलार्डने या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केला आणि त्यांना लोटांगण घालायला भाग पाडले. अखेरच्या षटकांमध्ये पोलार्डने धडाकेबाज फटकेबाजी केली. पोलार्डच्या या तुफानी फलंदाजीच्या जोरावरच मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकता आला. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलमधील चौथ्या विजयाची नोंद केली. त्याचबरोबर गुणतालिकेतील आपले चौथे स्थान कायम राखले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा संघ हाच फॉर्म कायम राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Scnfvu
No comments:
Post a Comment