नवी दिल्ली : आयपीएलमधला आजचा केकेआर आणि आरसीबीचा सामना रद्द झाला असला तरी उद्या होणाऱ्या सामन्याला मात्र धोका नाही. दिल्लीच्या मैदानातील पाच कर्मचारी हे करोना पॉझिटीव्ह सापडल्यामुळे उद्याचा मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना होणार की नाही, याबाबत संदिग्धती होती. पण आता या सामन्याला धोका नसल्याची गोष्ट पुढे आली आहे. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये उद्याचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी एक महत्वाची गोष्ट यावेळी सांगितली आहे. जेटली यांनी सांगितले की, " या मैदानातील पाच कर्मचारी करोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. पण जे कर्मचारी करोना पॉझिटीव्ह सापडले आहेत त्यांच्यापैकी कोणलाही मैदानाची जबाबदारी देण्यात आली नव्हती." दिल्ली क्रिकेट संघटनेचे सचिव राजन मनचंदा यांनीही एक गोष्ट याबाबत सांगितली आहे. मनचंदा यावेळी म्हणाले की, " आमच्या स्टाफमधील जी लोकं सामन्याची तयारी करत आहेत त्यांच्यापैकी कोणीही व्यक्ती करोना पॉझिटीव्ह सापडलेला नाही. सामन्याची तयारी करणारे सर्व कर्मचारी हे सुरक्षित आहेत." दिल्लीच्या मैदानाची तयारी करणारे कोणतेही कर्मचारी हे करोना पॉझिटीव्ह सापडलेले नाहीत. त्यामुळे या मैदानातील सामना रद्द होण्यासाठी कोणतेही सबळ कारण दिसत नाही. त्यामुळे हा सामना नियोजित वेळेनुसारच होईल, असे समजते आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने फक्त आजचा सामना रद्द करत आहोत, असे म्हटले आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजचा सामना वगळता कोणत्याही लढती रद्द करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे उद्या होणारा मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना नियोजित वेळेनुसार होणार असल्याचेच दिसत आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती कोणीही दिलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय किंवा आयपीएलची प्रशासकीय समिती याबाबत कोणते पत्रक काढून अधिकृत माहिती देणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SroZBr
No comments:
Post a Comment