नवी दिल्ली : सोमवारी पहिल्यांदा कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातील दोन खेळाडूंना करोना झाल्याची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला होता. पण आता केकेआरच्या संघात करोना कुठून आला असेल, ही गोष्ट आता पुढे येताना दिसत आहे. केकेआरच्या संघातील दोन खेळाडूंना करोना झाला. यामध्ये फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोघांनी नावं पुढे आली आहेत. या दोघांपैकी एक खेळाडू आयपीएलच्या बायो बबलमधून बाहेर गेला होता आणि तिथूनच करोनाची लागण या खेळाडूला झाली असे आता समोर येत आहे. वरुण चक्रवर्तीला दुखापत झाली होती. या दुखापतींची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी वरुण हा एका हॉस्पिटलमध्ये गेला होता. वरुणने यावेळी आयपीएलचे बायो बबल सोडले होते आणि त्याला ग्रीन चॅनेलमधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्याचवेळी वरुणला करोनाची लागण झाल्याचे आता समोर येत आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती केकेआरच्या संघाने दिलेली नाही. पण वरुण बायो बबलमधून बाहेर गेल्यानंतरच त्याला करोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे. याबाबतचे पहिले वृत्त क्रिकइन्फो या वृत्तसंस्थेने दिले आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत पत्रकामध्ये म्हटले आहे की, " गेल्या चार दिवसांमध्ये खेळाडूंची तिसरी करोना चाचणी घेण्यात आली होती आणि यामध्येच ही गोष्ट आता पुढे आली आहे. केकेआरचे काही खेळाडू हे चाचण्यांसाठी बायो बबलच्या बाहेर गेले होते. त्यामुळे आता आमची वैद्यकीय टीम या गोष्टीचा तपास करत आहे. गेल्या ४८ तासांमध्ये कोणाबरोबर संपर्क आल्यामुळे खेळाडू करोना पॉझिटीव्ह आले आहेत, याचा तपास सुरु आहे." कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना करोना झाल्याचे वृत्त समोर आले होते. यामुळे आज होणारी कोलकाता आणि बेंगळुरू मॅच पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील तिघांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले. यात संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनरचा समावेश आहे. दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे, संघातील कोणत्याही खेळाडूला किंवा अन्य कोणालाही करोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे चेन्नईचा पुढचा सामना सुरळीत होऊ शकतो की नाही, याबाबत काही वेळातच निर्णय घेतला जाणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xHBtES
No comments:
Post a Comment