नवी दिल्ली: मुंबई इंडियन्सचा अनुभवी ऑलराउंडर कायरन पोलार्ड()ने आयपीएल २०२१ मध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात स्फोटक फलंदाजी केली. विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची अवस्था चेन्नई सुपर किंग्जने ३ बाद ८१ अशी केली होती. सामना मुंबईच्या हातातून जाईल की काय असे वाटत असताना पोलार्डने धमाका केला. वाचा- पोलार्डने फक्त १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. या सामन्यात त्याने ८ षटकार आणि ४ चौकार मारले. आयपीएलमध्ये मुंबईकडून सर्वात वेगाने अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पोलार्डच्या नावावर जमा झालाय. वाचा- आयपीएलमध्ये मुंबईने प्रथमच २००पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला. विशेष म्हणजे चेन्नईने मुंबई विरुद्ध २१८ ही सर्वोच्च धावसंख्या केली होती. तरी देखील त्यांचा पराभव झाला. वाचा- याआधी पोलार्डने २०१६ साली कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर इशान किशनने २०१८ मध्ये केकेआर विरुद्ध १७ चेंडूत ५० धावा केल्या होत्या तर २०१९ साली हार्दिकने केकेआरविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक केले होते. वाचा- मुंबई विरुद्धच्या सामन्यात अंबाती रायडूच्या तुफान अर्धशतकाच्या जारोवर चेन्नईने ४ बाद २१८ धावा केल्या होत्या. मुंबईने अखेरच्या चेंडूवर विजयाचे लक्ष्य पार केले. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3374Lid
No comments:
Post a Comment