नवी दिल्ली: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जवर चार विकेटनी थरारक विजय मिळवला. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना कारयन पोलार्डने विजयाचे लक्ष्य मिळवून दिले. विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी शानदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. ही जोडी शार्दुल ठाकूरने फोडली. त्याने रोहित शर्माला ३५ धावांवर बाद केले. त्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. रोहितच्या जागी आलेल्या सूर्यकुमार यादवला जडेजाने ३ धावांवर बाद केले. त्यानंतर मोइन अलीने डी कॉकला ३८ धावांवर माघारी पाठवले. त्यामुळे मुंबईची अवस्था शून्य बाद ७१ वरून ३ बाद ८१ अशी झाली. धावांचा पाठलाग करताना मुंबई मागे पडत असताना कायरन पोलार्डने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर आलेल्या मोइन अली याने फाफ डु प्लेसिससह मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची भागिदारी केली. मोइन अलीला बुमराहने बाद केले. त्याने ३६ चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. त्यानंतर फाफने अर्धशतक केले आणि तो पोलार्डच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २८ चेंडूत ५० धावा केल्या. १२व्या षटकात पोलार्डने पाचव्या चेंडूवर त्याला बाद केला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर सुरेश रैनाला २ धावांवर बाद करून चेन्नईची अवस्था १ बाद १११ वरून ४ बाद ११६ अशी केली. झटपट दोन विकेट पडल्याने चेन्नईची धावसंख्या धीमी झाली. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि रविंद्र जडेजाने चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. रायडूने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २७ चेंडूत ७ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ७२ धावा केल्या. तर जडेजाने नाबाद २२ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून पोलार्डने सर्वाधिक २ विकेट तर बुमराह आणि बोल्टने प्रत्येकी एक विकेट घेतली. बुमराहने ४ षटकात ५६, धवलने ४८ तर बोल्टने ४२ धावा दिल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ebafPa
No comments:
Post a Comment