नवी दिल्ली: मध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विशाल लक्ष्याचा पाठलाग करत चेन्नई सुपर किंग्जवर चार विकेटनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईने मुंबईसमोर २१९ लक्ष्य दिले होते. मुंबईने कायरन पोलार्डच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर हे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर पार केले. वाचा- आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबईला चांगली सुरूवात करून दिली होती. पण रोहित बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला होता. त्यानंतर पोलार्डने थोड अशक्य वाटणारे आव्हान पार करून दिले. त्याने फक्त ३४ चेंडूत ८७ धावा केल्या. थरारक विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, हा सामना त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक टी-२० लढतीपैकी एक होती. वाचा- माझ्या आयुष्यातील हा सर्वात रोमांचक असा टी-२० सामना आहे. पोलार्डने शानदार कामगिरी केली. मैदान छोटे होते त्यामुळे गोलंदाजांची परिस्थिती थोडी अवघड होती. जर एखादा फलंदाज अखेरपर्यंत क्रीझवर राहिला तर तो लक्ष्य पार करू शकतो. आम्हाला माहित होते की फलंदाजीसाठी मैदान चांगले आहे. त्यामुळे २० षटकापर्यंत क्रीझवर राहण्याचे ठरवले. सुरुवात चांगली झाल्यानंतर क्रुणाल आणि पोलार्ड यांनी डाव सावरला. हार्दिक आणि जेम्स निशम यांच्यामुळे विजयावर विश्वास होता, असे रोहित म्हणाला. वाचा- या सामन्यात पोलार्डने दोन षटकात १२ धावा देत दोन विकेट घेतल्या. पोलार्डला अखेरच्या षटकातील सर्व चेंडू खेळायचे होते. पोलार्ड म्हणाला... अखेरच्या षटकात स्ट्राइक माझ्याकडे ठेवायचा होता. कारण सहा चेंडू मी खेळले तर विजय पक्का झाला असता. धोनी म्हणाला... खराब क्षेत्ररक्षणामुळे आमचा पराभव झाला. गोलंदाजीच्या तुलनेत क्षेत्ररक्षण खराब झाले. महत्त्वाच्या क्षणी कॅच सोडले. गोलंदाजांनी देखील योजनेनुसार काम केले नाही. त्यांनी खराब गोलंदाजी केली, असे महेंद्र सिंह धोनी म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33bfEzq
No comments:
Post a Comment