नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ५५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत राजस्थानने २२० धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल हैदराबादला ८ बाद १६५ धावा करता आल्या. हैदराबादचा हा सात सामन्यातील सहावा पराभव ठरला आहे. वाचा- विजयासाठी २२१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर आलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या आणि भागिदारी करता आली नाही. त्यांच्याकडून सलामीवीर मनिष पांडेने ३१ तर जॉनी बेयरस्टोने ३० धावा केल्या. सातत्याने विकेट गमवल्यामुळे हैदराबादला विजयाच्या लक्ष्यापर्यंत पोहचता आले नाही. वाचा- त्याआधी हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जयसवाल याला १२ धावांवर बाद करू राशिद खानने चांगली सुरूवात करून दिली. पण त्यानंतर आलेल्या कर्णधार संजू सॅमसनने जोस बटलरसह दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची भागिदारी केली. संजूने ३३ चेंडूत ४८ धावा केल्या. यात २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. वाचा- संजू बाद झाल्यानंतर बटलरने शतक पूर्ण केले. या आयपीएलमधील हे तिसरे शतक ठरले. याआधी राजस्थानच्या संजूने पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या देवदत्त पडिक्कलने शतक केले होते. बटलरने ६४ चेंडूत १२४ धावा केल्या. यात ८ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश होता. वाचा- हैदराबादकडून राशिद खान आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात हैदराबाद आणि राजस्थान या दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन आणि दोन बदल केले होते. हैदराबादने माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सुचित आणि कौल यांच्या जागी नबी, भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समद यांना संधी दिली. तर राजस्थानने जयदेव उनाडकटच्या जागी त्यागी तर शिवम दुबेच्या जागी अनुज रावत यांना संधी दिली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xBrfWR
No comments:
Post a Comment