नवी दिल्ली : आयपीएलच्या १४व्या हंगामात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जवर चार विकेटनी विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कायरन पोलार्ड विजयाचा शिल्पकार ठरला. वाचा- रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने फाफ डु प्लेसिस, मोइन अली आणि अंबाती रायडू यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २० षटकात २१८ अशी मोठी धावसंख्या उभी केली. उत्तरादाखल रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात करून दिली. पण रोहित शर्मा ३५ धावांवर बाद झाल्यानंतर मात्र मुंबईच्या तीन विकेट झटपट पडल्या. वाचा- मुंबईची अवस्था ३ बाद ८१ अशी असताना कायरन पोलार्डने वादळी खेळी केली. त्याने पक्त १७ चेंडूत ५० धावा केल्या. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १६ धावाची गरज होती. पोलार्डने दोन चेंडूवर धावाही काढल्या नाहीत. तरी विजय मिळवून दिला. वाचा- अखेरच्या चेंडूवर मुंबईला विजयासाठी दोन धावांची गरज होती. लुंगी एगिडीने चेंडू टाकण्याआधीच नॉन स्ट्रायकरच्या दिशेला असलेल्या धवल कुलकर्णीने क्रिझ सोडले. धवलच्या या कृतीवरून आता नवा वाद सुरू झाला आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग यांनी मुंबई इंडियन्सच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. मी माफी मागतो. कालच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज असताना नॉन स्ट्रायकर दिशेच्या फलंदाजाने गैरफायदा घेतला. याला तुम्ही खिलाडूवृत्ती म्हणाल का? असे हॉगने म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f2FYld
No comments:
Post a Comment