Ads

Saturday, May 1, 2021

IPL 2021 MI vs CSK: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई; चेन्नईने दिले डोंगराएवढे आव्हान

नवी दिल्ली: मोइन अली आणि फाफ डुप्लेसिसच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१८ धावा केल्या. मोइन अलीने ५८, फाफने ५० धावा तर अंबाती रायडूने २७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. मुंबईकडून कायरन पोलार्डने २ विकेट घेतल्या. वाचा- मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर आलेल्या मोइन अली याने फाफ डु प्लेसिससह मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची भागिदारी केली. मोइन अलीला बुमराहने बाद केले. त्याने ३६ चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. त्यानंतर फाफने अर्धशतक केले आणि तो पोलार्डच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २८ चेंडूत ५० धावा केल्या. १२व्या षटकात पोलार्डने पाचव्या चेंडूवर त्याला बाद केला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर सुरेश रैनाला २ धावांवर बाद करून चेन्नईची अवस्था १ बाद १११ वरून ४ बाद ११६ अशी केली. वाचा- झटपट दोन विकेट पडल्याने चेन्नईची धावसंख्या धीमी झाली. पण त्यानंतर अंबाती रायडू आणि रविंद्र जडेजाने चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. रायडूने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २७ चेंडूत ७ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ७२ धावा केल्या. तर जडेजाने नाबाद २२ धावा केल्या. वाचा- मुंबई इंडियन्सकडून पोलार्डने सर्वाधिक २ विकेट तर बुमराह आणि बोल्टने प्रत्येकी एक विकेट घेतली. बुमराहने ४ षटकात ५६, धवलने ४८ तर बोल्टने ४२ धावा दिल्या. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nI3is7

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...