नवी दिल्ली: संपूर्ण देश करोना संकटाशी लढत आहे. अशात आयपीएलचा १४वा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेतील काही खेळाडूंनी देशातील करोना रुग्णांसाठी मदत जाहीर केली होती. आता आणखी एका खेळाडूने आयपीएलच्या वेतनातील १० टक्के रक्कम करोना रुग्णांच्या उपचारासाठी देण्याचे जाहीर केले आहे. वाचा- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने करोना रुग्णांच्या ऑक्सिजनसाठी एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्याच्या आधी कोलकाता नाइटच्या पॅट कमिन्सने आणि आयपीएलमधील समालोचक ब्रेट लीने देखील मदत जाहीर केली होती. राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा याने आयपीएलच्या पगाराचा १० टक्के भाग करोनाशी लढाई करणाऱ्या गरजू लोकांना देण्याचे जाहीर केले आहे. जयदेवला गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सने ३ कोटी रुपयांना विकत घेतले होते. वाचा- जयदेवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली. मी आयपीएलच्या वेतनातील १० टक्के भाग गरजू लोकांच्या उपचारासाठी देत आहे. माझे कुटुंबीय ही मदत योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्याची काळजी घेतली. जय हिंद! असे जयदेवने म्हटले आहे. याचा अर्थ जयदेवने ३० लाख इतकी रक्कम देणार आहे. वाचा- करोनाशी लढणाऱ्या भारता ऑक्सिजन, औषधे, बेड आणि व्हेंटिलेटरची कमी आहे. देश संकटात आहे. आम्ही नशिबवान आहोत की क्रिकेट खेळू शकतो. आपल्या व्यक्तीला गमावने खुप दु:खद असते, असे त्याने म्हटले आहे. मी असे म्हणणार नाही की या वेळी क्रिकेट खेळणे योग्य आहे. पण या काळात कुटुंबापासून मित्रापासून दूर राहणे अवघड आहे. मला वाटते की खेळ थोड्या वेळेसाठी आनंद निर्माण करतो. ज्यांनी कुटुंबातील व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्यासाठी मी संवेदना व्यक्त करतो, असे सांगत त्याने करोना लस घेण्याचे आवाहन केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PE50OD
No comments:
Post a Comment