चेन्नई : देशात करोनाची दुसरी लाट सुरू होण्याच्या काही दिवस आधी आयपीएलच्या १४व्या हंगामाला सुरुवात झाली. आता तर आयपीएलच्या बायो बबलमधील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाल्याने आता संपूर्ण स्पर्धा स्थगित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली. आता आयपीएलच्या १४व्या हंगामाची जी अवस्था झाली आहे. त्याला जबाबदार असल्याचे समोर आले आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्यामुळे ही वेळ आली आहे. वाचा- सूत्रांकडून कळालेल्या माहितीनुसार गव्हर्निंग काउंसिलने या वर्षी ९ एप्रिल रोजी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही स्पर्धा युएईमध्ये घेण्याचा प्रस्ताव दिला होता. आयपीएल ही एक दिर्घकाळ चालणारी स्पर्धा आहे. त्यामुळे जीसीचे अध्यक्ष असलेल्या ब्रिजेश पटेल यांच्या नेतृत्वाखालील समीतीने बीसीसीआयला ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव दिला होता. देशात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे असल्याने जीसीने बीसीआयला इशारा दिला होता. फक्त जीसीच नाही तर आयपीएलमधील चार संघांनी देखील १४वा हंगाम युएईमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव दिला होता. पण बीसीसीआयने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. गेल्या वर्षी आयपीएलचा १३वा हंगाम युएईमध्ये यशस्वीपणे पार पाडला होता या गोष्टीकडे बीसीसीआयने लक्ष दिले नाही. या वर्षी स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधीपर्यंत युएईला स्टॅडबाय ठेवण्यात आले होते, असेही सूत्रांनी सांगितले. युएई हाच आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलचा पहिला पर्याय होता. त्यांनी बीसीसीआयला ही स्पर्धा युएईमध्ये शिफ्ट करण्याचा प्रस्ताव दिला होता. इतक नव्हे तर एमिरट्स क्रिकेट बोर्डला देखील अलर्टवर ठेवण्यात आले होते. ईसीबी देखील आयपीएलच्या पुन्हा आयोजनाला तयार होते. ते देखील अगदी कमी कालावधीत.. पण बीसीसीआयने त्या दृष्टीने पाउल उचलले नाही. बीसीसीआयचे अधिकारी कोण पहिले पाऊल टाकेल याची वाट पाहत बसले आणि तेथेच बीसीसीआयने स्वत:चा घात केला. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि खजिनदार अरुण सिंग धुमल हे देखील आयपीएलच्या जीसीचे सदस्य आहेत. इंग्लंड दौऱ्यामुळे आला होता विश्वास बीसीसीआयने भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी, ५ टी-२० आणि ३ वनडे मालिकेचे यशस्वी आयोजन केल्यामुळे आयपीएल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो असा विश्वास बोर्डाला आलाा होता असे सूत्रांनी सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vIG0oH
No comments:
Post a Comment