मुंबई: IPL चा १४वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी घेतला. बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. कालच आयपीमधील दोन खेळाडूंना बायो बबलमध्ये असताना करोनाची लागण झाली होती. वाचा- काल सोमवारपासून आयपीएलच्या १४व्या हंगामावर स्थगितीचे ढग तयार झाले होते. अखेर बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जमधील सपोर्ट स्टाफमधील एकाला कोरनाची लागण झाली होती. या पाश्वभूमीवर बीसीसीआयने कालची कोलकाता आणि बेंगळुरू ही लढत स्थगित केली होती. तर आज सकाळी उद्या होणारी चेन्नई आणि राजस्थान ही लढत स्थगित केली होती. दरम्यान बीसीसीआय आयपीएलचे सामने मुंबई खेळवणाच असे वृत्त समोर आले होते. पण त्याविरोधात देखील मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. वाचा- देशात गेल्या काही दिवसात देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात आयपीएलच्या बायो बबलमध्ये राहणाऱ्यांना करोना झाल्याने काळजी वाढली होती. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मंगळवारी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्थगित करण्यात आले आहे. स्पर्धा पुन्हा कधी होणार याचा आम्ही विचार करतोय. पण सध्या तरी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. वाचा- आणखी एका खेळाडूला झाला करोना आयपीएलच्या १४व्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सच्या दोन खेळाडूंना सोमवारी कोरना झाल्याचे समोर आले होते. तर मंगळवारी सकाळी सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज आणि विकेटकिपर वृद्धीमान सहा याला देखील करोना झाल्याचे आढळले. हैदराबाद संघातील तो एकमेव खेळाडू आहे ज्याला करोनाची लागण झाली आहे. अन्य खेळाडूंची टेस्ट नेगेटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. सनरायझर्स हैदराबाद संघाने दिलेल्या माहितीनुसार फक्त वृद्धीमान सहाला करोनाची लागण झाली आहे. पण संपूर्ण संघाला आयसोलेट करण्यात आले आहे. अन्य खेळाडूंची करोना चाचणी नेगेटिव्ह आली आहे. सोमवारी कोलकाता संघातील २ खेळाडू आणि चेन्नई संघातील सपोर्ट स्टाफमधील दोघांना करोनाची लागण झाली होती. यामुळे दोन सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आज संध्याकाळी होणारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील लढत नियोजित वेळेनुसार होणार होती. पण आता संपूर्ण स्पर्धाच स्थगित करण्यात आली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xMRYzN
No comments:
Post a Comment