नवी दिल्ली : आयपीएलच्या १४व्या हंगामाला ९ एप्रिल रोजी सुरूवात झाली होती. आज रविवारी डबल हेडरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीसह प्रत्येक संघाच्या सात लढती पूर्ण झाल्या. साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ लढती खेळतो. त्यामुळे या स्पर्धेचा पहिला टप्पा पार पडला आहे. वाचा- रविवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ५५ धावांनी पराभव केला आणि गुणतक्यात पाचवे स्थान मिळवले. गुणतक्यात चेन्नई सुपर किंग्ज १० गुण आणि प्लस १.२६३च्या सरासरीने पहिल्या स्थानावर आहेत. काल मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभवानंतर देखील ते पहिल्या स्थानावर कायम राहिले. तर दिल्ली कॅपिटल्स १० गुण आणि प्लस ०.४६६ सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आज त्यांनी पंजाबवर विजय मिळवल्यास पहिल्या स्थानावर पोहोचू शकतात. वाचा- विराटचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ १० गुण आणि वजा ०.१७१च्या सरासरीसह तिसऱ्या तर गेल्या दोन सामन्यात विजय मिळवून देखील मुंबई इंडियन्स ८ गुण आणि प्लस ०.०६२ सरासरीसह चौथ्या स्थानावर आहे. वाचा- राजस्थान रॉयल्स ६ गुणांसह पाचव्या, पंजाब किंग्ज ३ विजयासह सहाव्या, कोलकाता नाइट रायडर्स दोन विजयासह सातव्या तर सनरायझर्स एका विजयासह अखेरच्या स्थानावर आहेत. वाचा- सर्वाधिक धावा करणारे फलंदाज १) केएल राहुल- ३३१ धावा २) फाफ डु प्लेसिस- ३२० ३) शिखर धवन- ३११ सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज १) हर्षल पटेल- १७ विकेट २) ख्रिस मॉरिस- १४ विकेट ३) आवेश खान- १३ विकेट
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uexZrg
No comments:
Post a Comment