नवी दिल्ली : भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा मैदानात शांत असतो, तो आता चांगलाच भडकलेला आहे. कारण भुवनेश्वर बाबत एक चुकीची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर भुवनेश्वर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. त्यानंतर भुवनेश्वरने आता एक मोठा खुलासाही केला आहे. इंग्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची काही दिवसांपूर्वीच घोषणार करण्यात आली. भुवनेश्वरची भारताच्या संघात निवड करण्यात आलेली नाही. त्यानंतर भुवनेश्वरबाबत बरीच चर्चा झाली होती आणि त्यालाच आता कसोटी क्रिकेट खेळायचे नाही. त्यामुळेच त्याची निवड भारतीय संघात झाली नाही, असे म्हटले गेले होते. पण या गोष्टीचे खंडन आता भुवनेश्वरनेच केले आहे. भुवनेश्वरने याबाबत एक ट्विट केले आहे. त्यामध्ये भुवनेश्वरने म्हटले आहे की, " माझ्याबाबत काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. मला कसोटी क्रिकेट खेळायचे नाही, असे काही जणांनी म्हटले होते. पण मी स्पष्ट करू इच्छितो की, मी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी निवड समितीपुढे उपलब्ध असेन. त्यामुळे मला कसोटी क्रिकेट खेळायचे नाही, ही गोष्ट निराधार आहे. माझा असा सल्ला आहे की, अशा चुकीच्या बातम्या देऊ नये." भुवनेश्वरवर हर्नियाची सर्जरी झाल्यानंतर त्याच्या फिटनेसवर परिणाम झाला. भुवी भारतीय कसोटी संघात नसला तरी श्रीलंका दौऱ्यात जाणाऱ्या भारतीय संघात त्याचा समावेश होऊ शकतो. या दौऱ्यात भारत प्रत्येकी ३ टी-२० आणि वनडे सामने खेळणार आहे. भुवीने भारतीय संघाकडून २०१३ साली पहिली कसोटी मॅच खेळली होती. पण आतापर्यंत तो फक्त २१ सामने खेळू शकला. या २१ सामन्यात त्याने ६३ विकेट घेतल्या आहेत. त्याने २०१८ साली जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरची कसोटी खेळली होती. त्यामुळे आता भुवनेश्वर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आता भुवनेश्वरनेच या गोष्टीचे खंडन केले आहे. त्यामुळे आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी भुवनेश्वर हा उपलब्ध असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tQbOa5
No comments:
Post a Comment