Ads

Sunday, May 16, 2021

पाकिस्तानच्या शोएब अख्तरने दिली होती भारताच्या क्रिकेटपटूला धमकी, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यात जबरदस्त तणाव असतो. पण याच तणावामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताच्या एका खेळाडूला धमकी दिल्याची गंभीर गोष्ट आता समोर आली आहे. शोएबची धुलाई केल्यानंतर त्याने भारताच्या खेळाडूला धमकी दिली होती. नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या...पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी गुवाहाटीमध्ये वनडे सामने खेळवला जात होता. भारतीय संघ यावेळी धावांचा पाठलाग करत होता आणि रॉबिन उथप्पा आणि इरफान पठाण हे दोघे फलंदाजी करत होता. यावेळी शोएब हा भेदक गोलंदाजी करत होता. त्यावेळी भारतीय संघाला जिंकण्यासाठी २५ चेंडूंत १२ धावांची गरज होती. त्यावेळी एक चेंडू शोएबने असा टाकला की त्याचे उत्तर उथप्पाकडे नव्हते. पण त्यानंतरच्या चेंडूवर उथप्पाने चौकार लगावला होता. भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. भारतीय संघाला ४ धावांची गरज होती. त्यावेळी शोएबच्या गोलंदाजीवर पुढे जाऊ मोठा फटका मारायचा हे उथप्पाने ठेरवले होते. त्याच्या पुढच्या चेंडूवर उथप्पा पुढे सरसावला आणि चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर उथप्पाने शोएबने कशी धमकी दिली, ते सांगितले आहे. उथ्पपा म्हणाला की, " गुवाहाटीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढचा सामना ग्वाल्हेर येथे होता. या सामन्यापूर्वी भारतीय संघ डिनर करत होता. डिनर झाल्यावर मी एका मित्राच्या रुममध्ये गेलो होतो. तिथे शोएबही होता. त्यावेळी शोएब मला म्हणाला की, तु गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली आणि माझ्या गोलंदाजीवर चांगले फटकेही मारले. पण यापुढे जर तु पुढे येऊ खेळलास तर मी बीमर सरळ तुझ्या डोक्यावरच टाकेन. त्यामुळे आता कसं खेळायचं हे तु ठरवं." शोएबने या सामन्यापूर्वी उथप्पाला डोक्यावरर चेंडू टाकण्याची धमकी दिली होती. पण यावेळी उथप्पा शांत राहिला आणि त्याने शोएबला काहीच उत्तर दिले नाही. उथप्पाने जर त्याला उत्तर दिले असते तर वाद वाढला असता आणि कदाचित त्यांच्यावर कारवाई होऊ शकली असती. ही सर्व गोष्ट उथ्पपाने एका यु ट्युबवरील कार्यक्रमात सांगितली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bxheAx

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...