चेन्नई: मधील १४व्या विरुद्ध पंजाब किंग्जने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब आणि हैदराबाद संघाने प्रत्येकी ३ लढती खेळल्या आहेत. त्यापैकी पंजाबचा २ मध्ये तर हैदराबादचा तिनही सामन्यात पराभव झालाय. वाचा- पंजाब आणि हैदराबाद गुणतक्यात सातव्या आणि आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची आहे. पंजाब तिसरा पराभव तर हैदराबाद सलग चौथा पराभव टाळण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात पंजाब संघाने दोन बदल केले आहेत. तर हैदराबाद संघाने तीन बदल केलेत. वाचा- कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या चौथ्या लढतीत केन विलियमसन, केदार जाधव आणि सिद्धार्थ कौल यांचा समावेश केला आहे. केदार जाधवला या वर्षी चेन्नई सुपर किंग्जने रिलीझ केले होते आणि लिलावात हैदराबादने त्याला विकत घेतले. केदार हैदराबादकडून आज पदार्पण करत आहे. वाचा- पंजाबने फॅबियन अॅलन आणि मॉइसिस हेनरिक्स यांना संधी दिली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3x6Xo8p
No comments:
Post a Comment