चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात काल मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ विकेटनी पराभव केला. दिल्लीने मुंबई इंडियन्सवर २०१९च्या आयपीएलमधील साखळी लढतीनंतर प्रथमच विजय मिळवला. वाचा- मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर याने एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला. शिखरने सलामीवीर म्हणून आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. वाचा- सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने ४ हजार ६९२, तिसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल ने ४ हजार ४८० धावा केल्या आहेत. वाचा- आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा शिखरच्या नावावर आहेत. त्याने २०० हून अधिक धावा केल्या आहेत. याच बरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखरच्या नावावर आहे. त्याच्या नावावर दोन शतक देखील आहेत. वाचा- आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून सर्व प्रथम एक हजार धावा एडम गिलख्रिस्टने केल्या होत्या. त्यानंतर २ हजार धावा सचिन तेंडुलकर तर ३ आणि ४ हजार धावा ख्रिस गेलने केल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. या यादीत शिखर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dyAWNE
No comments:
Post a Comment