नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामातील बायो बबलच्या वातावरणात करोना व्हायरसचा शिरकाव झालाय. अहमदाबाद येथे असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर आता आणखी एका संघात करोनाची रुग्ण सापडले आहेत. वाचा- महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील तिघांना करोनाची लागण झाली आहे. यात संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनरचा समावेश आहे. दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे, संघातील कोणत्याही खेळाडूला किंवा अन्य कोणालाही करोनाची लागण झालेली नाही. हे सर्व खेळाडू दिल्लीत आहेत. वाचा- रविवारी झालेल्या चाचणीत चेन्नई संघाशी संबंधित तिघांना करोना झाल्याचे समोर आले. संघाचे सीईओ काशी विश्वनाथन, बालाजी आणि मेंटेनस स्टाफची सोमवारी पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. जेणेकरून चाचणीतील चुकीच्या निकालाची शंका संपून जाईल. जर त्यांच्या चाचणीचे रिपोर्ट पुन्हा एकदा पॉझिटीव्ह आले तर त्यांना संघाच्या बाबो बबल बाहेर १० दिवस रहावे लागेल. त्यानंतर टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतरच संघात परत येता येईल. वाचा- सोमवारी सकाळी सर्व प्रथम कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना करोना झाल्याचे वृत्त समोर आले होते. यामुळे आज होणारी कोलकाता आणि बेंगळुरू मॅच पुढे ढकलण्यात आली आहे. वाचा- बालाजी हा भारताचा माजी जलद गोलंदाज आहे. तो शनिवारी संघसोबत डगआउटमध्ये होता. त्याच दिवशी मुंबई आणि चेन्नई संघाची मॅच झाली होती. काशी विश्वनाथ यांच्या पत्नीला आयपीएलच्या १३व्या हंगामात करोना झाला होता. तेव्हा स्पर्धा युएईमध्ये झाली होती. दुबईत असलेल्या चेन्नई संघातील काही जणांना करोनाची लागण झाली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vDLPUq
No comments:
Post a Comment