मेलबर्न: भारतात व्हायरसची दुसरी लाट आली असून रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. देशात रोज नवे ३ लाख करोना रुग्ण आढळत आहेत. केल्या काही दिवसात ही संख्या चार लाखवर देखील गेली होती. तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या ३ हजारच्या जवळ पोहोचली आहे. या कठीण परिस्थितीत जगभरातील अनेक देश भारताच्या मदतीला येत आहेत. अशीच मदत क्रिकेट विश्वातून करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने करोना विरुद्धच्या लढाईत भारताला ५० हजार ऑस्ट्रेलियान डॉलर इतकी मदत दिली आहे. वाचा- क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या शिवाय आणखी निधी गोळा करणार असल्याचे म्हटले आहे. खेळाडूंच्या संघटना आणि UNICEFच्या मदतीने आणखी निधी गोळा केला जाणार आहे. वाचा- भारतातील करोना संकटात क्रिकेट ऑस्ट्रेलियात मदत करत आहे. , ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू, संघटना आणि UNICEF अधिकाअधिक निधी गोळा करेल असे सीएने म्हटले आहे. भारतात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यासाठी अनेक देशांनी मदत जाहीर केली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या १४व्या हंगामात खेळत आहेत. यापैकी काही खेळाडूंनी देशातील करोना लढ्यात आर्थिक मदत देऊ केली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gYkc4j
No comments:
Post a Comment