मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामात करोनाचे संकट वाढत चालले आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना बीसीसीआयला स्थगित करावा लागला होता. आता स्पर्धेतील आणखी एक मॅच स्थगित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली आहे. वाचा- बुधवारी ५ मे रोजी होणारी आणि यांच्यातील मॅच स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील अरुण जेठली मैदानावर होणारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लढत स्थगित केली गेली आहे. ही लढत बुधवारी संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार होती. दिल्लीच्या मैदानावर २ मे रोजी स्पर्धेतील २९वी लढत खेळली गेली होती. ही लढत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाली होती. कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोना झाल्याने दिल्ली संघाला क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. आता दिल्लीत होणारी मॅच खेळण्यास चेन्नई सुपर किंग्ज तयार नाही. वाचा- सोमवारी कोलकाता संघातील वरून चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना करोना झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे सोमवारची लढत पुढे ढकलण्यात आली होती. कोलकाता संघाच्या संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंना काळजी घेण्यास सांगितले आहे. याच दरम्यान चेन्नई संघातील गोलंदाजीचे प्रशिक्षक एल बालाजी याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. बीसीसीआयच्या नियमानुसार जोपर्यंत बालाजीची तीन टेस्ट नेगेटिव्ह येणार नाहीत तोपर्यंत त्याला क्वारंटाइन रहावे लागणार आहे. त्याच बरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील सहा दिवस क्वारंटाइन रहावे लागणार आहे. उद्या होणारी चेन्नई आणि राजस्थान यांच्यातील लढत SOP नियमानुसार स्थगित करण्यात आली आहे. बालाजी आणि खेळाडूंचा संपर्क आला असून त्या सर्वांना क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. त्याची प्रत्येक दिवशी करोना चाचणी होत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tiupLs
No comments:
Post a Comment