नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादचा सामना उद्या मुंबई इंडियन्सबरोबर होणार आहे. पण या सामन्यापूर्वी हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नावाचा एक ट्रेंड सोशल मीडियावर चांगलाच सुरु झाला आहे. या ट्रेंडमध्ये चाहत्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली पाहायला मिळत आहे. या हंगामाची सुरुवात होत असताना वॉर्नरकडे हैदराबादच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. पण आतापर्यंत वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे गेल्या सामन्यापूर्वी वॉर्नरकडून संघाचे नेतृत्व काढण्यात आले. हैदराबादच्या संघाने यावेळी संघाचे नेतृत्व केन विल्यम्सनकडे सोपवले आहे. त्याचबरोबर वॉर्नरला संघात स्थानही दिले नव्हते. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. वॉर्नरकडून चांगले नेतृत्व पाहायला मिळाले नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी तो एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे आणि त्यामुळेच त्याला संघात स्थान द्यायला हवे, हा विचार चाहते करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला वॉर्नरला संघात परत आणा (#BringBackWarner) असा ट्रेंट चांगलाच जोर धरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. वॉर्नरला पुन्हा एकदा संघात स्थान हैदराबादच्या संघाने द्यायला हवे, असे मत चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33bvgTW
No comments:
Post a Comment