नवी दिल्ली : आयपीएल स्थगित करण्याचा मोठा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयानंतर आयपीएलमधील परदेशी खेळाडूंची मोठी अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलमधील काही परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशांनी प्रवेश नाकारला आहे. त्याचबरोबर काही देशांनी याबाबत अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या खेळाडूंनी आता नेमके करायचे तरी काय, हा सर्वात मोठी प्रश्न आहे. आयपीएल स्थगित केल्यामुळे या खेळाडूंची झाली आहे मोठी अडचण, जाणून घ्या प्रत्येक संघातील खेळाडूचेन्नई सुपर किंग्स - मोइन अली, सॅम करन, जेसन बर्डनडॉफ. दिल्ली कॅपिटल्स - स्टीव्हन स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, ख्रिस वोक्स, टॉम करन, सॅम बिलिंग्स. कोलकाता नाइट राडयर्स - इऑन मॉर्गन, पॅट कमिन्स आणि बेन कटिंग्स. मुंबई इंडियन्स - ख्रिस लीन आणि नॅथन कल्टर नाइल. पंजाब किंग्स - डेव्हिड मलान, ख्रिस जॉर्डन, झाय रिचर्डसन, रिली मेरेडिथ, मोइसेस हेनरिक्स. राजस्थान रॉयल्स - जोस बटलर, अँड्र्यू टाय, लायम लिव्हिंगस्टोन. आरसीबी - ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तियन, डॅनियल सॅम्स. सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने आता भारतातील विमानांना आणि प्रवाशांना बंदी घातली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना १५ मेपर्यंत तरी आपल्या देशात जाता येणार नाही, असेच चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मालदिव या देशाचा आसरा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर इंग्लंडने अजूनही या खेळाडूंबाबत कोणताच निर्णय घेतलेला दिसत नाही. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंचे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आयपीएलमधील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंचाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचे दिसत आहे. कारण अन्य देशांमध्ये आयपीएलमधील खेळाडू जाऊ शकतात आणि त्याबाबतची चर्चाही आता सुरु झाली आहे. पण अजूनही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू नक्की कधी आपल्या देशात जाऊ शकतील, याबाबतची कोणतीही गोष्ट अजून पुढे आलेली दिसत नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Sr4xAz
No comments:
Post a Comment