नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामातील २८व्या सामन्यात आज () आणि () यांच्यात लढत होणार आहे. यासामन्यात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. वॉर्नरच्या जागी केन विलियमसन हैदराबादचे नेतृत्व करताना दिसेल. याच बरोबर वॉर्नरला संघातून देखील डच्चू दिला जाऊ शकतो. सलामीवीर म्हणून जेसन रॉय याला संधी मिळू शकते. वाचा- हैदराबादने वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सहा पैकी एका लढतीत विजय मिळवला आहे. गुणतक्त्यात ते सर्वात अखेरच्या क्रमांकावर आहेत. खराब कामगिरीमुळे वॉर्नरला पदावरून हटवले. आता केनच्या नेतृत्वाखाली कामगिरी सुधारण्याची शक्यता आहे. वाचा- राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीत हैदराबादकडून जॉनी बेयरस्टो आणि जेसन रॉय हे सलामीला येऊ शकतात. बेयरस्टो शानदार फॉर्ममध्ये आहे. रॉय देखील आक्रमक फलंदाज असल्याने हैदराबादला चांगली सुरूवात मिळू शकते. मधळ्या फळीत केन विलियमसन, मनिष पांडे आणि केदार जाधव यांच्यावर धावा करण्याची जबाबदारी असेल. वाचा- ऑलराउंडर म्हणून विजय शंकर आणि जे सुचित यांच्यावर जबाबदारी असेल. सुचिने दिल्लीविरुद्धची लढत सुपर ओव्हरमध्ये पोहोचवली होती. गोलंदाजीत राशिद खानसह खलील अहमद, संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौल यांच्यावर सर्व धुरा असेल. वाचा- संभाव्य संघ जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन (कर्णधार), मनीष पांडे, केदार जाधव, विजय शंकर, जगदीश सुचित, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eaGFcX
No comments:
Post a Comment