ढाका: करोना व्हायरसमुळे स्थगित झालेला आयपीएलचा १४वा हंगाम पुन्हा सुरु करण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. यासाठी टी-२० वर्ल्डकपच्या आधी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील २० दिवसांच्या विंडोचा वापर केला जाणार. आयपीएल २०२१मधील उर्वरित ३१ लढती युएईमध्ये होणार आहेत. यासंदर्भात बीसीसीआयने घोषणा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिंन्सने आयपीएलच्या या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली होती. आता आणखी काही खेळाडूंनी देखील टी-२० वर्ल्डकपच्या आधी आयपीएल खेळणार नसल्याचे म्हटले आहे. वाचा- बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की ते आयपीएलच्या उर्वरित लढतींसाठी त्यांच्या खेळाडूंना ना हकत प्रमाणपत्र देणार नाही. याचाच अर्थ आयपीएलमध्ये बांगलादेशचे खेळाडू खेळणार नाहीत. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून हे दोन खेळाडू खेळतात. या दोन्ही खेळाडूंना बीसीबीनेन १८ मे पर्यंत आयपीएल खेळण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी मायदेशात जायचे होते. पण आता आयपीएलचा दुसरा टप्पा जेव्हा आयोजित केला जाणार आहे तेव्हा बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. यामुळेच बीसीबीने एनओसी देण्यास नकार दिला आहे. वाचा- बीसीबीच्या आधी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने देखील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामुळे त्यांचे खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकत नाही असे म्हटले होते. तर ऑस्टेलियाच्या पॅट कमिंन्सने माघार घेतल्यानंतर आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही अद्याप यावर चर्चा केली नाही असे सीए कडून सांगण्यात आले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SMCf3n