नवी दिल्ली : रायपूर येथे सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमधील सामने सुरू आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाकडून , , आदी दिग्गज खेळाडू खेळत आहेत. करोनामुळे ही स्पर्धा गेल्या वर्षी स्थगित करण्यात आली होती. आता पुन्हा ती सुरू झाली आहे. भारताने वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करुन विजयाची हॅटट्रिक केली. वाचा- या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघातील माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या खास शैलीत पोस्ट करणाऱ्या सेहवागने सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाचा- इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ भारतीय संगाच्या ड्रेसिंग रुममधील आहे. सेहवाग सोबत सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग देखील आहेत. या व्हिडिओत सेहवाग गंमतीने सचिनला म्हणतो, हा आमचा देव आहे. अजून देखील क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहेत. सुई लावून मॅच खेळत आहे. सचिन तेव्हा फिजिओकडून थेरपी करत असतो. त्यानंतर सेहवाग कॅमेरा युवराज सिंगकडे नेतो. तेव्हा युवराज त्याला म्हणतो, हे बघ तु वाघ आहेस पण तो ढाण्या वाघ आहे. वाचा- युवीच्या या डायलॉगवर सर्वजण हसू लागतात. सेहवाग पुन्हा कॅमेरा सचिनकडे घेऊन येतो आणि त्याला काही प्रतिक्रिया देणार का विचारतो. त्यावर सचिन म्हणतो की तुझ्या समोर कोणाला प्रतिक्रिया देण्याची संधी मिळते का? पाहा व्हिडिओ- वाचा- भारतीय संघाने गेल्या आठवड्यात बांगलादेशचा १० विकेटनी पराभव केला होता. या सामन्यात सेहवागने ३५ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या होत्या. ज्यात ५ षटकार आणि १० चौकारांचा समावेश होता. तर सचिनने २६ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या होत्या. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qyWVHs
No comments:
Post a Comment