नवी दिल्ली: () २०२१च्या चौथ्या क्वार्टर फायनल सामन्यात मुंबईचा सलामीवीर ( )ने पुन्हा एकदा स्फोटक फलंदाजी केली. काही दिवसांपूर्वी पृथ्वीने या स्पर्धेत नाबाद द्विशतक झळकावले होते. आता पुन्हा त्याने नाबाद १८५ धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाचा- मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यात झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यात पृथ्वीच्या या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईने ९ विकेटनी विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले. या सामन्यात सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करत २८५ धावा केल्या होत्या. मुंबईने हे लक्ष्य ४१.५ षटकात ९ विकेट राखून पार केले. मुंबईच्या या विजयात पृथ्वी पुन्हा एकदा हिरो ठरला. वाचा- पृथ्वीने १२३ चेंडूत ७ षटकार आणि २१ चौकारांसह नाबाद १८५ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १५०.४१ इतका होता. तर दुसरा सलामीवीर यशस्वी जयस्वालने ७५ धावा केल्या. यशस्वी बाद झाल्यानंतर पृथ्वीने आदित्य तारेसह संघाला विजय मिळून दिला. आदित्यने नाबाद २० धावा केल्या. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या पृथ्वीला संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर तो मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे शतक असून याआधी दिल्लीविरुद्ध नाबाद १०५, त्यानंतर पुड्डुचेरीविरुद्ध नाबाद २२७ तर आता नाबाद १८५ धावा केल्या आहेत. वाचा- विजय हजारे स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर आता पृथ्वीला भारतीय संघात स्थान मिळते का हे पाहावे लागणार आहे. पृथ्वीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण धमाकेदार झाले होते. त्याने पदार्पणाच्या कसोटीत शतक केले होते. पण त्यानंतर पृथ्वी फार प्रभाव टाकू शकला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vaTs5i
No comments:
Post a Comment