दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने २०२१च्या सुरूवातीला प्रत्येक महिन्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या पुरस्काराचा पहिला मानकरी ऋषभ पंत ठरला होता. आता फेब्रुवारी महिन्याचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. वाचा- आयसीसीने मंगळवारी ९ मार्च रोजी पुरुषांच्या विजेत्याची घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात हा पुरस्कार भारताचा फिरकीपटू ( )ला जाहीर झाला आहे. तर महिलांमध्ये इंग्लंडच्या Tammy Beaumont ने हा पुरस्कार जिंकला. आयसीसीच्या या पुरस्कारांमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात भारतीय खेळाडूने बाजी मारली आहे. वाचा- इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत आर अश्विनने शानदार कामगिरी केली होती. अश्विनने संपूर्ण मालिकेत ३२ विकेट घेतल्या होत्या. तर एक शतक देखील झळकावले होते. त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराच्या शर्यतीत रुट देखील होता. फक्त या महिन्यात नाही तर गेल्या महिन्यात देखील रूटचे नाव संभाव्या खेळाडूंमध्ये होते तेव्हा पंतने बाजी मारली होती. वाचा- वाचा- फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या ३ कसोटीत अश्विनने १ शतक आणि २४ विकेट घेतल्या. या मालिकेत त्याने सर्वात वेगाने ४०० विकेट घेण्याचा जगातील दुसरा गोलंदाज होण्याचा मान मिळवला. मालिकेतील धमाकेदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कार देखील मिळाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38qPZ9g
No comments:
Post a Comment