Ads

Tuesday, March 16, 2021

मोहम्मद अझरुद्दीनची अफलातून कामगिरी; धोनीसह दिग्गजांना जमले नाही, Video

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी झालेल्या मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणारा केरळचा युवा विकेटकिपर आणि फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन ( ) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाचा- मुश्ताक अली स्पर्धेत ३७ चेंडूत शतक करणाऱ्या अझरुद्दीनला आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने २० लाख रुपयांच्या बेस प्राइसला विकत घेतले होते. क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलमध्ये अझरची कामगिरी पाहण्याची इच्छा आहे. आयपीएलच्या आधी अझरने त्याचा जलवा पुन्हा एकदा दाखवला आहे. वाचा- लोकल टी-२० स्पर्धेत (केसीए प्रेझिडेंट टी-२० कप) मध्ये अझरुद्दीन एसीए इगल्स संघाकडून खेळत आहे. १५ मार्च रोजी झालेल्या लढतीत केसीए टस्कर्स विरुद्धच्या सामन्यात अझरने अशी काही विकेटकिपिंग केली ज्याने सर्व जण हैराण झाले. वाचा- अझरने टस्कर्सचा फलंदाज कृष्णराज श्रीनाथ यांना धावबाद केले. अझरने धावबाद केलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर तो जवळ असलेल्या फिल्डरकडे गेला. फलंदाजाचा विचार एक चोरटी धाव घेण्याचा होता पण ते शक्य नसल्याने तो पुन्हा क्रिझकडे धावला. एवढ्यात फिल्डरने दिलेला थ्रो अझरने हवेत उडी मारून घेतला आणि चेंडू विकेटला लावला. या व्हिडिओवर चाहते प्रतिक्रिया देत आहे. अझरने फक्त विकेटच्या मागे चांगली कामगिरी केली नाही तर त्याने फलंदाजीत देखील ४३ चेंडूत ६९ धावा केल्या. यात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. या सामन्यात केसीए इगल्सने ४३ धावांनी विजय मिळवला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qUOne6

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...