दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणी एक मोठी कारवाई झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईच्या आघाडीच्या दोन क्रिकेटपटूंवर कारवाई केली आहे. वाचा- युएईचे आघाडीचे फलंदाज आणि या दोघांवर आयसीसीने ८ वर्षाची बंदी घातली आहे. या दोघांवर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप झाला होता. दोघांनाही जानेवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. नवेद फक्त आघाडीचा फलंदाज नाही तर युएईकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे. त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. वाचा- २०१९ साली झालेल्या टी-२० क्वालिफायल लढतीत नावेद आणि शैमान यांनी सामना फिक्स करण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांना आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. वाचा- मोहम्मद नावेद याआधी २०१९ मध्येच टी-१० लीग स्पर्धेतील सामना फिक्सिंग प्रकरणात सापडला होता. हे दोन्ही खेळाडू ८ वर्ष कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. वाचा- मोहम्मद नावेद आणि शैमान अन्वर यांनी देशाकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. नावेद तर संघाचा कर्णधार देखील होता. तो युएईकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. हे दोघे बऱ्याच वर्षापासून युएईकडून खेळत आहेत, असे आयसीसीचे जनरल मॅनेजर एलेक्स मार्शल यांनी सांगितले. वाचा- फिक्सिंग सारख्या प्रकरणात सहभागी होणे हे देश, संघातील सहकारी आणि चाहते यांच्याशी केलेला धोकाच आहे. इतका अनुभव असताना त्यांनी फिक्सिंग करणाऱ्यांपासून दूर रहायला पाहिजे होते. अशा प्रकारच्या गोष्टीत सहभागी होऊन त्यांनी विश्वासघात केला. हा युएईच्या क्रिकेट समर्थकांशी केलेला धोका असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Ot1nL3
No comments:
Post a Comment